महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शिक्षणोत्सव शाळा भेट

राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ ते १२ वी व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ च्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी शासनाने अतिरिक्त मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार दि.४ ऑक्टोंबर २०२१ पासून शाळा सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

या दिवशी राज्यातील शाळांमध्ये शिक्षणोत्सव साजरा केला जाणार आहे. या दरम्यान प्रत्येक क्षेत्रीय अधिकारी यांनी शाळा भेटी दरम्यान काढलेले फोटो, व्हिडिओ हे स्वतःच्या. अथवा सहकाऱ्याच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अकाऊंट वरून पोस्ट करावयाचे आहेत.

फोटो सोबत स्वतःचे नाव, पद, भेट दिलेल्या शाळेचे नाव व यू डायस क्रमांक, भेटीचा दिनांक व वेळ याचा लिखित (टेक्स्ट) तपशील अपलोड करणे आवश्यक राहील.

सदर पोस्ट फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वर करून झाल्यावर संबधित अधिकारी यांनी सदर पोस्ट ची लिंक कॉपी करून घ्यावी व https://scertmaha.ac.in/mvmj/ पोर्टल वरील फॉर्म मध्ये आवश्यक तपशील भरून आपल्या पोस्ट ची लिंक द्यावी.


शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षकांच्या कार्य गौरव प्रित्यर्थ खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी
कार्यक्रमाचे नाव विषय
  1. वक्तृत्व
  2. चित्र रेखाटन
  3. काव्य वाचन
  4. निबंध
  1. माझा आवडता शिक्षक
  2. शिक्षक दिन
  3. मी शिक्षक/शिक्षिका झालो/झाले तर...
इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी
कार्यक्रमाचे नाव विषय
  1. निबंध लेखन
  2. वक्तृत्व
  3. स्वरचित कविता लेखन
  4. काव्यवाचन
  1. माझा शिक्षक माझा प्रेरक
  2. कोविड कालावधीतील शिक्षकांची भूमिका
  3. माझ्या जीवनातील शिक्षकांचे स्थान
  4. उपक्रमशील शिक्षक
इयत्ता नववी ते इयत्ता बारावी
कार्यक्रमाचे नाव विषय
  1. निबंध लेखन
  2. वक्तृत्व
  3. शिक्षकांची मुलाखत
  4. काव्य लेखन
  5. काव्य वाचन
  1. आधुनिक काळामध्ये शिक्षकांची बदललेली भूमिका
  2. देशाच्या जडणघडणी मध्ये शिक्षकांचे योगदान
  3. शिक्षक : समाज परिवर्तनाचे माध्यम
  4. माझ्या शिक्षकाचा नाविन्यपूर्ण उपक्रम