SCERT Maharashtra
State Council of Educational Research and Training, Maharashtra, Pune.
State Curriculum Framework 2021
भारतात भविष्यवेधी दृष्टीकोनातून नवीन शिक्षण प्रणाली विकसित करणेसाठी भारत सरकारने दिनांक २९ जुलै २०२० रोजी मंजूर केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ( NEP 2020) नुसार प्रत्येक राज्याने पुढील ४ घटकांवर राज्य अभ्यासक्रम आराखडा विकसित करणे अपेक्षित आहे.

राज्य अभ्यासक्रम आराखडा घटक :
 • १. शालेय शिक्षण
 • २. बालपणातील काळजी व शिक्षण
 • ३. शिक्षक शिक्षण
 • ४. प्रौढ शिक्षण
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याच्या धोरण विकसन प्रक्रियेत राज्याकडून उपरोक्त चारही घटकांवर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा विकसित करण्यात येणार आहेत. राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मितीची प्रक्रिया ही सर्वसमावेशक व राज्यातील प्रत्येक विषयातील तज्ञ व्यक्तींचे प्रतिनिधित्व घेऊन अधिक व्यापक स्वरूपात करण्यात येत आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यापूर्वी खालील २५ पोझिशन पेपर तयार करण्यात येत आहेत. सदर पोझिशन पेपर तयार करण्यासाठी राज्यातील तज्ञ व्यक्तींचे जास्तीत जास्त योगदान, विचार, मत, सूचना विचारात घेऊन सर्वसमवेशक व विस्तृत पोझिशन पेपर तयार करण्यासाठी सदर सुविधा तयार करण्यात आली आहे. सदर पोजिशन पेपर मधील जास्तीत जास्त प्रश्नांच्या विहित शब्दमर्यादेतील योग्य उत्तरे,मते,सूचना यांचा समावेश राज्य अभ्यासक्रम आराखडा,अभ्यासक्रम,पाठ्यपुस्तक निर्मिती व अनुषंगिक शैक्षणिक प्रक्रियेत करता येईल.

यासाठी पुढील कार्यपद्धतीचा अवलंब करावा.

 • आपले तज्ञत्व असणाऱ्या विषयाचा/ चे पोझिशन पेपरची/च्या आराखडा (template) प्रत डाउनलोड करा.
 • पोझिशन पेपर च्या आराखड्यात आवश्यक मुद्यांच्या अनुषंगाने आपले मत/सूचना/योग्य उत्तरे देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व आनुषंगिक साहित्याचे वाचन करा.
 • आपण डाउनलोड केलेल्या पोझिशन पेपरच्या मसुदयामधील मुद्यांच्या अनुषंगाने आपले मत/सूचना/योग्य उत्तरे मराठी अथवा इंग्रजी मध्ये तयार करा.
 • आपले मत/सूचना/योग्य उत्तरे तयार झाल्यावर आपण पोर्टल वर आपली नावनोंदणी करा.
 • नावनोंदणी नंतर आपले तज्ञत्व असणाऱ्या विषयाचा/ चे पोझिशन पेपरची/च्या आरखड्यामध्ये पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने आपले मत/सूचना/योग्य उत्तरे/ प्रतिसाद मराठी अथवा इंग्रजी मध्ये नोंदवा व सबमीट करा.
 • आपण नोंदविलेल्या आपल्या प्रतिसादाची प्रत आपणास आपण पोर्टल वर दिलेल्या आपल्या ईमेल वर पाठविण्यात येईल.
 • याबाबत तांत्रिक अडचण असल्यास positionpapers@maa.ac.in या ईमेल वर आपण संपर्क साधू शकता.
 • पोझिशन पेपर साठी योगदान देण्यासाठीची अंतिम दिनांक.३० मे २०२२ राहील.

पोझिशन पेपर आराखडा
Positon Paper Templates