SCERT Maharashtra
State Council of Educational Research and Training, Maharashtra, Pune.
State Curriculum Framework 2021 - Contributor Application Form
भारतात भविष्यवेधी दृष्टीकोनातून नवीन शिक्षण प्रणाली विकसित करणेसाठी शासनाने दिनांक २९ जुलै २०२० रोजी मंजूर केलेला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ( NEP 2020) म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षणाचा व्यापक आराखडा असून त्यात ग्रामीण आणि शहरी भागासाठी व्यावसायिक प्रशिक्षणाचा देखील समावेश करण्यात आला आहे.राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद मार्फत पुरविण्यात आलेल्या इ-टेम्पलेटमध्ये पुढीलप्रमाणे ४ घटकांवर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा विकसित करणे अपेक्षित आहे.
ते घटक पुढीलप्रमाणे :
  • १. पायाभूत शिक्षण
  • २. शालेय शिक्षण
  • ३. शिक्षक शिक्षण
  • ४. प्रौढ शिक्षण
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विकसन प्रक्रियेत राज्यांकडून उपरोक्त चारही घटकांवर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा तसेच अभ्यासक्रम, पाठ्यक्रम व अध्ययन - अध्यापन साहित्य विकसित करण्यात येणार आहेत.या सर्व प्रक्रियेसाठी विहित विषयात तज्ज्ञत्व असलेल्या व्यक्तींची गरज भासणार आहे. हा फॉर्म सदर प्रक्रीयेसाठी तज्ज्ञ व्यक्तींची निवड करणेसाठी तयार करण्यात आला आहे.
फॉर्म भरणेआधी सूचनांचे वाचन करा.
  • सदर नोंदणी ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत चार राज्य अभ्यासक्रम आराखडा विकसित करणेसाठी राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या सदस्य निवडीसाठी तसेच अभ्यासक्रम, पाठ्यक्रम व अध्ययन - अध्यापन साहित्य विकसनाकरिता सदस्य निवडीसाठी करण्यात येत आहे.
  • राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेस प्राप्त प्रतिसादातून छाननी केल्यानंतर विहित निकषांच्या आधारे निवड प्रक्रिया घेण्यात येईल.
  • निवड करण्यात आलेल्या समिती/ मंडळ यांस राज्य शासनाच्या सुकाणू समितीची मान्यता घेण्यात येईल.
  • उपरोक्त सदस्य निवडीचे अधिकार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेस असतील.सदर निवड प्रक्रियेत हस्तक्षेप करता येणार नाही, केल्यास फॉर्म रद्दबातल करण्यात येईल.
  • सदर नोंदणी फॉर्म भरताना काही प्रश्न वा तांत्रिक अडचण आल्यास आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून आपण mh.neptrackerneha@gmail.com या इमेल आय डी वर संपर्क साधू शकता.
The National Education Policy 2020 (NEP 2020), which was approved on 29 July 2020, outlines the vision of India's New Education System. The policy is a comprehensive framework for Foundation education to higher education as well as vocational training in both rural and urban India. Four Types of State Curriculum Frameworks are to be developed as per NCF Provided by NCERT time to time.
  • 1. SCF for foundation stage
  • 2. SCF for School Education
  • 3. SCF for Teacher Education
  • 4. SCF for Adult Education.
In line with SCFs, Curriculum, Syllabus, Teaching learning material will be developed. The team of experts for these SCFs in relation to designing. Curriculum, syllabus and teaching learning material will be selected in phase wise manner as per the application received through this link. Further selection process will be done as per criteria.

Please read the instructions before filling out the form.
  1. The Main objective of this registration is to select members for steering Committee for 4 SCFs developing State Curriculum Framework the implementation National Education Policy - 2020.
  2. Application will be scrutinized as per criteria for final selection.
  3. Selection process will be conducted by SCERT, Maharashtra, Pune and final approval of steering Committee will be taken from GoM.
  4. Only SCERT, Maharashtra, Pune has the right to select candidates. No one will interfere in this process, if anyone tries to interfere, his/ her form will be rejected.
  5. In case of any query or technical problem while filling the said registration form, you can contact the email id mh.neptrackerneha@gmail.com from your registered mobile number.
राज्य अभ्यासक्रम आराखडा - तज्ज्ञ निवड पत्र दि.२४.०३.२३
नोंदणी बंद झाली आहे.
Registration is Closed.