SCERT Maharashtra
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
राज्य अभ्यासक्रम आराखडा - २०२३ - अशासकीय संस्था निवड नोंदणी फॉर्म

शिक्षण मानव आणि समाज उन्नयनाचे एक प्रभावी साधन आहे. प्राचीन काळापासून भारताला ऐतिहासिक समृद्ध शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात वैश्विक समाजाला अनेक देणगी भारतीय शिक्षणतज्ज्ञांनी, वैज्ञानिकांनी दिल्या आहेत.प्राचीन भारतीय सांस्कृतिक, शैक्षणिक वारसाची परंपरा आपल्याला लाभली आहे. अभिजात ज्ञान, कला आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा अंगीकार करून २१व्या शतकातील वैश्विक स्वीकाहार्य बालक घडविण्याचे कार्य आपण करत आहोत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये भारतकेंद्री शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे.

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार पायाभूत स्तर,शालेय शिक्षण,शिक्षक शिक्षण आणि प्रौढ शिक्षण असे चार प्रकारचे राज्य अभ्यासक्रम आराखडे(SCF)विद्याप्राधिकरण म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे या संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. बालकांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्यात शासकीय संस्थांसोबतच अनेक अशासकीय संस्था कार्यकरत आहेत.

विविध अशासकीय संस्था विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि समाजउत्थानासाठी गाव, वाडी, वस्ती, तांडा, पाडे, दुर्गम व अतिदुर्गम आदिवासी भाग यामध्ये नाविन्यतेची जोड देऊन वैविध्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग राबवित आहेत. समाजातील प्रत्येक बालक शिक्षणाच्या प्रवाहात येती, टिकती व शिकती व्हावी, यासाठी निस्वार्थ हेतूने प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने अशा अशासकीय संस्थांच्या या शैक्षणिक प्रयोगाचे, अनुभव व तज्ज्ञत्वाचा लाभ सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून राज्य अभ्यासक्रम आराखडे विकसनामध्ये अशासकीय संस्थांचा सहभाग घेण्याचा शासनाचा मानस आहे.

चार ही प्रकारच्या राज्य अभ्यासक्रम आराखडे प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि पुरोगामी महाराष्ट्र म्हणून इतर राज्यांसाठी मॉडेल म्हणून विकसित करण्यासाठी अशासकीय संस्थांच्या तज्ज्ञत्वाचे सहकार्य अनिवार्य आहे.याकरिता राज्य अभ्यासक्रम आराखडा विकसनामध्ये इच्छुक सर्व अशासकीय संस्थांनी आपली माहिती प्रस्तुत लिंकमध्ये भरावी. यापूर्वी ज्यांनी लिंक भरली आहे, त्या सर्व अशासकीय संस्थांनी पुन्हा एकदा नव्याने ही लिंक भरणे आवश्यक आहे.

अशासकीय संस्था नोंदणीसाठीची मुदत संपली आहे .
The registration for NGOs has been closed.
अशासकीय संस्था नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे (Pdf)
Documents to be attached in pdf format
  1. सचिवांच्या स्वाक्षरीने संस्था नोंदणी अधिनियम १८६० प्रमाणपत्र (असल्यास)
  2. सचिवांच्या स्वाक्षरीने न्यास कायदा १९५० प्रमाणपत्र (असल्यास )
  3. संस्थेने केलेल्या कामाचा स्वयं / बाह्य मूल्यांकन कार्याचा अहवाल (असल्यास)
  4. ऑडीट रिपोर्ट २०२१-२२ (असल्यास)
  5. ऑडीट रिपोर्ट २०२०-२१ (असल्यास)
  6. ऑडीट रिपोर्ट २०१९-२० (असल्यास)
  7. संस्था शासनाकडून बहिष्कृत नसलेबाबत स्वयं घोषणा प्रमाणपत्र (No Blacklisting Declaration)
नोंदणी Register / साइन इन Sign In
मोबाइल क्र. प्रविष्ट करा
ओटीपी प्रविष्ट करा.